जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला; पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Satya Nirnaya
0

जुन्या वादातून वादातून चाकूहल्ला

          सत्य निर्णय प्रतिनिधी मुंबई 

मुंबई, दि. १ जून २०२६ : साकीनाका परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ मे रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता साकीनाका येथील नहार अमृतशक्ती परिसरातील एका इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ समीर हा उभा असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. फिर्यादी सुनाजीद मुकदरअली खान (वय २६), हे समीरचे भाऊ असून त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पाच आरोपींनी संगनमताने समीरला लक्ष्य केले. हल्ल्यादरम्यान आरोपींनी त्याच्या छातीत चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यामागे त्याचा खून करण्याचा उद्देश असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६५/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास साकीनाका पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)