खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल
सत्य निर्णय प्रतिनिधी मुंबई
मुंबई, दि. १ जून २०२६ : देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर धारदार सत्तूराने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३० वाजता फिर्यादी गसमत अली रेहमतुल्ला सावंत (वय ४१) आणि त्यांचे मित्र हैदर अली सावंत (वय ५५) हे गोवंडी परिसरातून घरी जात होते. त्यावेळी इमामवाडा परिसरातील एका चिकन दुकानाजवळ दुकान चालक शकील आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकामगार यांच्यात सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
वादात हस्तक्षेप केल्याचा राग आल्याने संबंधित बालकाने चिकन कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार सत्तूर उचलून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
