परभणी, दि. २५ : - परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शेती क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली होती. परभणीचे प्रयोगशील शेतकरी श्री. लाड यांनी ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित करून कापूस उत्पादन वाढीसाठी मोठे कार्य केले.
त्यांच्या या सन्मानामुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
